Home सामाजिक काँग्रेसचे नेते – माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कव्वली कार्यक्रमाचे उदघाटन

काँग्रेसचे नेते – माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कव्वली कार्यक्रमाचे उदघाटन

39
0

सिरोंचा : येथील वर्षीप्रमाणे या वर्षी सुध्दा सिरोंचा येथे परिवर्तन भवन येथे मिलिंद बहुद्देशीय विकास मंडळ व नालंदा चार्टीटेबल ट्रस्ट सिरोंचाच्या वतीने संस्कृती परिवर्तन दिनाचा निमित्ताने फुले शाहू आंबेडकर महासम्मेलन 24 व 25 डिसेंबर ला आयोजित करण्यात आली.या कार्यक्रमात कव्वलीच्या उदघाटन गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंक डालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भगवान गौतम बुद्ध,महात्मा फुले,शाहू महाराज यांच्या प्रतिमेला फुल अर्पण करून कार्यक्रमला सुरुवात करण्यात आली.मी जिल्हा परिषदेत अध्यक्ष असताना ग्रामीण भागात विविध योजनेतून निधी उपलब्ध करून अनेक विकासकामे केलो.

सिरोंचा येथील परिवर्तन भवन येथे बुद्ध विहार बांधकामासाठी आपण प्रस्ताव मांडून नवीन इमारत मंजुरी आणू असे माजी जिप अध्यक्ष कंकडालावर यांनी पुढे बोलत होते.तसेच कार्यक्रमला आर्थिक मदत केले.यावेळी काँग्रेसचे बानय्या जनगाम, नगर पंचायत उपध्यक्ष बबलू पाशा यांनी उपस्थित बौध्द बांधवाना मार्गदर्शन केले.

यावेळी गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष बानय्या जनगाम,नगर उपअध्यक्ष बबलू पाशा, काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जावजी,वेंकटी दुर्गम, कावरे सर,मल्लिकार्जुन आकूला, मंदा शंकर,मारोती गणपुरपू, दुर्गेश लंबाडी,मजीद अल्ली,तिरुपती चिटयाला,गणेश राच्चवार,अजयभाऊ सोशल मीडिया समन्वयक संपत गोगुलासह सिरोंचा तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here