अहेरी : तालुक्यातील लगाम येथील युवकांनी आज आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेतले आहे.भेट दरम्यान लगाम येथील विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली.त्यावेळी काँग्रेस नेते कंकडालवार यांनी युवकांना सांगितले की”आपल्या गावातील प्रत्येक समस्या आणि युवकांचा समस्या लवकरत लवकर निराकरण करण्यात येईल अशी चर्चा दरम्यान युवकांना आश्वासन दिले.त्यावेळी लगाम युवकांनी अजयभाऊंची आभार मानले.
त्यावेळी युवकांनी म्हंटले की”येणाऱ्या आगामी लोकसभा – विधानसभा निवडणूकित काँग्रेस उमेदवारांना जिंकून देण्यासाठी आत्मविश्वासाने काम करणार अशी चर्चा दरम्यान माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना सांगण्यात आली.सदर भेट अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी जनसंपर्क कार्यालय येते भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,उपसरपंच सुरेश आत्राम,कोठारी ग्रामपंचायतचे सदस्य कालिदास कूसनाके,अरुण मडावी,धर्मेंद्र सिडाम,अनिल टेकाम,सागर मडावी,कुंदन सिडाम,नितेश आत्राम,तुषार मडावी,एकनाथ नैताम,अक्षय आत्राम,प्रवीण आत्राम,प्रवीण मडावी,कारण आत्राम,सोनू मडावी,हर्षा आत्राम,वंश मडावीसह लगाम येथील समस्त युवक तसेच आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.