अहेरी : वरून इंदाराम व देवलमरी या रस्त्याचे दोन्ही कडेला खूप मोठ्या प्रमाणात मोठं मोठे काटेरी झाडे असून या रस्त्यावरून यें-जा करणाऱ्यांना काटेरी झाडांमुळे त्रास होत असून या रस्त्यांवर अपघात होण्याची शक्यताही बळावली आहे.असे असतांना सुद्धा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.अहेरी,इंदाराम व देवलमरी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या काटेरी झाडे कापून रस्ता आवगमनासाठी मोकळा करून देण्याची मागणी जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांकडे केली आहे.संबंधीत रस्ता हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अखत्यारीत असल्याने या रस्त्यावरील काटेरी झाडे कापण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना अनेकदा भ्रमणध्वनी वरून माहिती दिल्यानंतर संबंधित विभाग अपघातांची वाट तर बघत नाही आहे ना ?असे प्रश्न आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा सभापती अहेरी बाजार समिती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित केला आहे.संबंधित विभागाने जातीने लक्ष देऊन काटेरी झाडे कापण्यात यावी.अन्यथा चुकून या रस्त्यावर एखादा अपघात होऊन कोणाचेही काही हानी झाल्यास यास सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम राहाल.