अहेरी : तालुक्यातील नवेगाव येथील ए.आर.जे.क्रिकेट क्लब नवेगाव द्वारे भव्य ग्रामीण रात्रकालीन 30 यार्ड क्रिकेट स्पर्धेचे आयोजित केले आहे.क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून पाहिलं पारितोषिक देण्यात येत आहे.तसेच दुसरा पारितोषिक अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती गीताताई चालूरकर,माजी उपसरपंच अशोक युलमुले कडून,तिसरा पारितोषिक माजी तंटामुक्ती अध्यक्ष हरिदास आत्राम,नगोराव सोनूते कडून देण्यात येत या स्पर्धेला अशी तीन पुरस्कार ठेवण्यात आली.
त्यावेळी उदघाटन प्रसंगी अहेरीतील क्रिकेट खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा,यासाठी माझा प्रयत्न आहे.स्पर्धांच्या माध्यमातून राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत आणि आपल्या अहेरी क्षेत्रातील नावलौकिक व्हावा असे मत माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी व्यक्त केले.
रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेची काल उदघाटन पार पडले आहे.सदर उदघाटन आदिवासी विध्यार्थी संघचे नेते,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झालं.या उदघाटन कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती गीताताई चालूरकर,माजी उपसरपंच अशोक येलमुले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी तंटामुक्ती अध्यक्ष हरिदास आत्राम,नगोराव सोनूते होते.
यावेळी मंचावर इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार,नामदेवराव येनगंट्टीवा,पोलीस पाटील महेश अरका,दादारावजी मडावी,नरेश मडावी,आनंदराव मारत,रोहित गलबलेरसह परिसरातील क्रिकेट प्रेमी तसेच काँग्रेस स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.