अहेरी : तालुक्यातील मोदुनतुर्रा येथील रहिवासी शामराव पानेम यांची मुलगी सौ.महालक्ष्मी शामराव पानेम हिला काही दिवसांपासून डोक्यात खूप दुकापत असल्याने महालक्ष्मी पानेम यांच्या घरचा आर्थिक परिस्थिती अत्यंत हालखीची असल्याने दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासाठी त्याना अडचण भासत होती.
आज काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडावार यांची अहेरी जनसंपर्क कार्यालय येते अजयभाऊंची भेट घेऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सांगितले होते.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी हस्तेने विचारपूस करून त्याला औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.
आर्थिक मदत दरम्यान रुग्णाचा आई पोच्चूबाई पानेमला अजयभाऊ कंकडालवार सांगितले की’यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य तो मदत करेन म्हणून पानेम कुटुंबियांना मोठा धीर दिला.या आर्थिक मदतीविषयी मोदुनतुर्रा येथील पानेम कुटुंबातील सदस्यांनी अजयभाऊंचे आभार मानले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगमसह पानेम परिवारातील सदस्य तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.