Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन

38
0

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत वेडमपल्ली अंतर्गत येत असलेल्या अर्कापल्ली येथील प्रियदर्शन क्लब अर्कापल्ली यांच्या वतीने भव्य खुले कब्बडी सामन्यांचे आयोजन करण्यात आले.या कब्बडी सामन्यांचे उद्धघाटक म्हणून आविसं काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे.

सहउद्धघाटक म्हणून सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेडामपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच अजयभाऊ मिसाळ होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य अजय नैताम होत.

या कब्बड्डी स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तसेच या कब्बड्डी स्पर्धेला द्वितीय – तृतीय पारितोषिक देण्यात येत आहे.

यावेळी आविसं काँग्रेसचे नेत्या व माजी पंचायत समिती सभापती सुरेखाताई आलाम,वेडमपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच अजय मिसाळ,वेडमपल्ली ग्रापं उपसरपंच रेशमाताई संदिप पोरतेट,देवलमारीचे उपसरपंच हरिष गावडे,श्रीनिवास राऊत,नरेंद्र गर्गम,अनुसुचित जाती सेल काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामचंद्र मुंजमकर, संदिप पोरतेट, मा. भिमराव आलाम, मा. पुरुषोत्तम सडमेक, मा. पोचम मिसाल, मा, बिच्चु पोरतेट, मा. मांतेश मडावी, मा. विलास आत्राम, मा. लक्ष्मण आत्राम, मा. राजेश आत्राम, मा. पुलय्या आत्राम, मा. राजेश मडावी, मा. जयराम आत्राम, मा. रमेश पोरतेट, मा. राहुल गोडबाले, मा. मल्लाजी आत्राम, मा. अशोक कटकमवार, मा. अशोक गावडे, मा. तिरूपती किर्तीवार, मा. सरोजना आत्राम, मा. इंद्रीरा गेडाम, मा. ज्योती आत्राम, मा. प्रेमिला गावडे शिवा सडमेक, सागर मडावी, दिनेश आत्राम, लक्ष्मण आत्राम, युवराज आत्राम, प्रमोद गोडशेलवार, सचिन पांचार्यासह आविसं काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here