Home अहेरी गुड्डीगुडम येथे शहिद वीर बाबुराव शेडमाके जयंती कार्यक्रम उत्सहात संपन्न…कार्यक्रमाला काँग्रेस नेते...

गुड्डीगुडम येथे शहिद वीर बाबुराव शेडमाके जयंती कार्यक्रम उत्सहात संपन्न…कार्यक्रमाला काँग्रेस नेते कंकडालवार यांची उपस्थिती

1
0

अहेरी : तालुक्यातील गुड्डीगुडम येथे स्वातंत्र्य वीर बाबूराव फुलेश्वर शेडमाके यांच्या जयंती कार्यक्रम गोंडवाना गोटूल समिती यांचा वतीने मोठ्या थाटात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पुतळा अनावरण तसेच सामूहिक विवाह सोहळा तथा गोंडवाना समाज प्रबोधन मार्गदर्शन सोहळा कार्यक्रमाचे सुद्धा आयोजित केले होते.

सदर कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या,अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्सहात पार पडला.

त्यावेळी कंकडालवार दाम्पत्यांच्या विविध नृत्य करत,ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.त्यावेळी शहिद वीर बाबुराव शेडमाके यांचा पुतळ्याचा अनावरण अजय कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आली.

तसेच या कार्यक्रमात एकूण 9 जोडप्यांचा एकच मंडपात सामूहिक विवाह सोहळा सुद्धा मोठ्या थाटात पार पडले.त्यावेळी कंकडालवार दाम्पात्यानंकडून नवदाम्पत्यासाठी वधू-वरांना नवे कपड़े,संसारोपयोगी साहित्य भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सर्व प्रथम अजय कंकडालवारांनी 1857 च्या इंग्रजाविरुध्द स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेले स्वातंत्र्यवीर,क्रांतीकारक क्रांतिवीर शहिद विर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here