अहेरी : तालुक्यातील कनेपल्ली येथील दर्गा बांधकामासाठी आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत देण्यात आले.
मोहरम निमित्त कनेपल्ली येथे दर्गा बांधकाम करण्यात येणार आहे.त्यासाठी गावातील लोकांना आर्थिक अडचण भासत होती.आज कनेपल्ली येथील समस्त नागरिकांनी अजयभाऊ कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालय येथील अजयभाऊंची भेट घेऊन भासत असलेल्या समस्या बाबत सांगितले होते.काँग्रेसनेते कंकडालवार यांनी मोहरम निमित्त होणाऱ्या दर्गा बांधकामा साठी आर्थिक मदत केली आहे.
कनेपल्ली येथे दर्गा बांधकामासाठी आर्थिक मदत मिळाल्याने गावकर्यांनी अजयभाऊंची आभार मानले.त्यावेळी मदत करतांना प्रमोद कोडेलवार,करण तोरेम,राजू कोपेल्लीवार,श्याम अप्पवार,किरण मडावी,श्रीमती आशाताई,अभिषेक कडालवार,कमलाकर बंडीवार,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,नरेंद्र गर्गमसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.