Home सिरोंचा कारसपल्ली ते सिरोंचा बायपास रोड नाल्यामुळे भुस्कलनची धोका

कारसपल्ली ते सिरोंचा बायपास रोड नाल्यामुळे भुस्कलनची धोका

7
0

सिरोंचा : गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेब आणि गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे,माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी सिरोंचा तालुका दौरा दरम्यान सिरोंचा ते कारसपल्ली बायपास रोडची पाहणी केली आहे.

सिरोंचा ते कारसपल्ली रस्त्यावर एक मोठा नाल्या असून.या पावसाळ्यात नाल्या हळू हळू कॅट होऊन रस्ता बाजूला आल्याने नागरिकांना भिंतीने त्या रस्त्यावार प्रवास कराव लागत आहे.या नाल्या जवळ असलेल्या खूप जमीनही नुकसान होत आहे.विशेष म्हणजे नाल्याचे बांधकाम लवकरात लवकर ना झाल्यास सिरोंचा शहरही जलमय होण्याची शक्यता आहे.

खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेब यांनी दौऱ्या दरम्यान कारसपल्ली नाल्यामुळे होत असलेल्या भूस्खलनची पाहणी करून लवकरात लवकर नाल्या पूल निर्माण साठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार अशी नागरिकांना मोठा धीर दिले.सिरोंचा वासियांना व प्रवासाना हा नाल्यामुळे धोकादायक ठरणार प्रोटेकशन वाॅल बनविण्यासाठी प्रयत्न करा अशी सिरोंचा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीशभाऊ जवाजी यांनी खासदार साहेबांना विनंती केली.

त्यावेळी खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेब यांनी नाल्या पाहणी करतांना सोबत माजी आमदार पेंटारामा तलांडी,आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी साहेब,जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले,बानया जनगाम,रवी सल्लम,अहमद अली शेख,माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,सिरांबोना बालय्या,अब्दुल सलामसह परिसरातील नागरिक तसेच महाविकास,काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here