सिरोंचा : गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेब यांनी दोन दिवस सिरोंचा तालुका दौऱ्यावर आले होते.त्यावेळी काँग्रेस कमिटी सिरोंचा तर्फे खासदार डॉ.नामदेवराव किरसान आणि गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे आणि माजी जि.प.अध्यक्ष तथा काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार, माजी आमदार पेंटारामाजी तलांडी,आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी साहेबा यांची ढोल तशाने फाटक्याचा अतिषय बाजी करत सिरोंचा शहरात जंगी स्वागत केली.
डॉ.नामदेवराव किरसान साहेबांनी तालुक्यातील विकास कामाचा आढावा बैठक,सिरोंचा ग्रामीण रुग्णालयतील भेट तसेच सिरोंचा काँग्रेस कमिटी कडून डॉ.नामदेवराव किरसान साहेब यांचा सत्कार कार्यक्रम दरम्यान स्थानिक सिरोंचा येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटनही पार पडले.त्यानंतर तालुका अध्यक्ष सतीशभाऊ जवाजी यांना शुभेच्छा देण्यात आले.
खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेब,जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे,माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी इंदिरानगर,आदीमुत्तापूर,बामणी,झिंगानूर,रेगुंठा,मोयबीनपेठा,पारसेवडासह आदी भागातील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या जाणून घेतली.संसदेत या समस्यांची आवाज उठवून लवकरात लवकर समस्यांची निराकरण करण्यात येईल अशी नागरिकांना आश्वासन दिले.
आज पर्यंत अनेक खासदार निवडून आले.पण आपला सारखं खासदार नागरिकांचा प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या जाणून घेतले नाही.आगामी विधानसभा आणि जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुक वेळी काँग्रेस पक्षाने खंबीर पणे उभे राहून काँग्रेस पक्षाचे उमेदवाराला जिंकून देण्यासाठी भक्कम पणे काम करणार अशी दौऱ्यावेळी नागरिकानी सांगितले आहे.
यावेळी महाविकास आघाडी व काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home सिरोंचा सिरोंचा येथील काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेबांचा हस्ते उदघाटन