Home सिरोंचा लंबडपल्ली गावात भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरा : अख्य गाव जय भीम,जय...

लंबडपल्ली गावात भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरा : अख्य गाव जय भीम,जय संविधान या घोषणांनी धूम धूमले

18
0

सिरोंचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिलला देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

आज भीम जयंती निमित्ताने सिरोंचा मुख्यालया पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पेंटिंपाका ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या लंबडपल्ली गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते.संपूर्ण गावात आणि गल्लीभोळ्यात बाबासाहेबांच्या निळ्या रंगाच्या तोरणे बांधून डीजेच्या तालावर भीम गीतांवर नाचत भव्य रैली काढण्यात आली.

त्यावेळी रोजगार सेवक संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष श्रीनिवास दुर्गम यांनी या जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहून भीम ध्वजाचे ध्वज रोहण केले.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.तसेच त्या ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रमाही आयोजित करण्यात आला होता.या महाप्रसादाचे गावकऱ्यांनी आस्वाद घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here