Home राजकीय जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या पॅनेलची आठ ग्राम पंचायतींवर एकहाती सत्ता

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या पॅनेलची आठ ग्राम पंचायतींवर एकहाती सत्ता

65
0

अहेरी : विधानसभा क्षेत्रातील २० ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत ८ ग्रामपंचायत मध्ये आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवाराचे पॅनेलने तब्बल आठ ग्राम पंचायतींवर एकहाती सत्ता संपादन केली आहे.

आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखालील आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे उमेदवारांनी अनेक ठिकाणी विधानसभा क्षेत्राचे आजी- माजी मंत्र्यांच्या पॅनेलचे उमेदवारांची धुव्वा उडवीत चांगलाच धक्का दिलेलं आहे.

भामरागड तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतींवर मागील अनेक वर्षांपासून अहेरीचे दोन्ही घराण्यांची एकहाती सत्ता असलेल्या ग्राम पंचायती यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांच्या गटाकडे आलेलं आहे.यात प्रामुख्याने नेलगुंडा,परायणार,होडरी,धिरंगी,कुव्वाकोडी सह मडवेल्ली आणि आरेवाडा ग्राम पंचायतीच्या सरपंच व सदस्यांच्या समावेश आहे.

तसेच अहेरी तालुक्यातील आवलमरी येथील सरपंच पदासह पाच सदस्य तर राजाराम ग्रामपंचायत मध्ये सात सदस्य,भामरागड तालुक्यातील टेकला ग्राम पंचायत मध्ये चार सदस्य,इरकडूम्मे येथे चार सदस्य तर एटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथे सात सदस्य तर नगुलवाही येथे दोन सदस्य निवडून आले.

एकंदरीत जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्य पाया असलेल्या ग्राम पंचायतींच्या निवडणुकांमध्ये आपली ताकद पणाला लावीत सर्वच ठिकाणी आपल्या पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणले.

आजी-माजी सत्ताधारी मंत्र्यांच्या गडात अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये अनेक ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता काबीज करून अजयभाऊ मित्र परिवार व आदिवासी विद्यार्थी संघटनेची झेंडा रोवल्याने सद्या जिल्ह्यात सगळीकडे याच निवडणूक निकालाची चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here