अहेरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिलला देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
काल भीम जयंती निमित्ताने अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते.संपूर्ण गावात आणि गल्लीभोळ्यात बाबासाहेबांच्या निळ्या रंगाच्या तोरणे बांधून डीजेच्या तालावर भीम गीतांवर नाचत भव्य रैली काढण्यात आली.
त्यावेळी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी भव्य मिरवणूक,रैलीला सहभाग होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करून मिरवणूक,रैली कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.
यावेळी आविसं,काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.