अहेरी : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्त हा दिवशी देशभरात व राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव व ७६ वा स्वातंत्र्य दिन निमित्त इंदाराम येथील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.आज १५ आगस्ट दिनानिमत्त इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात येते आविस व अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आला आहे.त्यावेळी अजयभाऊंनी स्वातंत्र्य दिनाच्या समस्त जनतेला शुभेच्छा देण्यात आला.यावेळी १० वी पास गुणवंत विद्यार्थ्यांनी भवानी अटेला हिचा सत्कार करण्यात आले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,इंदाराम ग्रामपंचायत सरपंच वर्षाताई पेंदाम,उपसरपंच वैभव कंकडालवार,गुलाबराव सोयाम ग्रामपंचायत सदस्य,शालिनीताई कांबळे ग्रा.प सदस्य,कविता सोयांम ग्रा.प सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश पेंदाम,पोलीस पाटील इंदाराम सदशिव दुर्गे,भगवंतराव हायस्कूल इंदारामचे मुख्याध्यापक ममीडालवार सर,कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयचे मुख्याध्यापिका ढवस मॅडम,जि.प.प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक पुलुरवार सर,ग्रामसेवक किरांगे सर, नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक,लक्ष्मण आत्रामसह आविसं अजयभाऊ मित्र कार्यकर्ते व गावकरी तसेच शिक्षक,विध्यार्थी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते