Home सिरोंचा सिरोंचा येथील मुलकला फाऊंडेशन कडून ज्येष्ठ पत्रकारांचे सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न

सिरोंचा येथील मुलकला फाऊंडेशन कडून ज्येष्ठ पत्रकारांचे सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न

70
0

सिरोंचा : येथील सेवाभावी व नामवंत मूलकला फाऊंडेशनकडून राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त सिरोंचा शहरातील व तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचे सत्कार समारंभाचे आयोजन येथील बांधकाम विभागाचे स्थानिक विश्रामगृहात आयोजीत करण्यात आला होता.सिरोंचा येथील मूलकला फाऊंडेशन कडून आयोजित सत्कार समारंभाला सत्कार मूर्ती म्हणून ज्येष्ठ पत्रकार नागभूषणम चकिनारपवार,मधुसूदन आरवेल्लीवार,रवी सल्लमवार,सुरेश टिपट्टीवार व अमित टिपट्टीवार आदि मान्यवर ज्येष्ठ पत्रकार मंडळी उपस्थित होते.

यावेळी मूलकला फाऊंडेशन चे अध्यक्ष सागर मुलकला व त्यांच्या संचालक मंडळींकडून ज्येष्ठ पत्रकार नागभूषणम चकिनारपवार,मधुसूदन आरवेल्लीवार,रवी सल्लमवार,अमित टिपट्टीवार व सुरेश टिपट्टीवार यांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार व सत्कारमूर्ती मधुसूदन आरवेल्लीवार यांनी ‘आजची पत्रकारिता’ या विषयावर उपस्थित पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले तर रवी सल्लमवार यांनी सिरोंचा तालुक्यात मुलकला फाऊंडेशनकडून सुरू असलेल्या विविध सामाजिक कार्यावर प्रकाश टाकले. तर यावेळी सर्व सत्कार मूर्तींनी व पत्रकार बांधवांनी मूलकला फाऊंडेशनचे कार्यांबद्दल शुभेच्छा दिले.

या कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व पत्रकारांना मूलकला फाऊंडेशन कडून पेन व बुक वाटप करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्तविक मूलकला फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर मूलकला तर सूत्र संचालन व उपस्थितांचे आभार श्यामराव बेज्जनीवार यांनी मानले.

सिरोंचा येथे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमाला नागभूषणम चकिनारपवार,रवी सल्लमवार, मधुसूदन आरवेल्लीवार,सुरेश टिपट्टी वार,श्यामराव बेज्जनीवार,फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर मूलकला,अमित टिपट्टीवार,जाकीर अली,सामाजिक कार्यकर्ता श्रीकांत शुगरवार,जलील फाशा,सलमान शेख,मुरलीधर मारगोनी,अशोक कुंमरी,सत्यम गोरा,विनोद नायडू,सुधाकर शिडाम,रवींद्र रादांडी, राजकुमार मूलकला,गणेश संन्ड्रा,उदयकिरण मूलकलासह विविध वृत्तपत्राचे पत्रकार ,डिजिटल मीडियाचे पत्रकार व फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.सत्कार समारंभ कार्यक्रम हे खेळीमय वातावरणात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here