Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

38
0

मुलचेरा : तालुक्यातील जय बजरंगबली क्रिकेट क्लब चिचेला यांच्या वतीने भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले.या क्रिकेट सामन्यांचे आविसं काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी होते.या क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.व्दितीय पारितोषीक सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हणमंतु मडावी यांच्या कडून देण्यात येत आहे.तर तृतीय पारितोषिक एम.जि तूनकलवार सर – गोमणी ग्रामपंचायतचे उपसरपंच साईनाथ चौधरी – सत्यवान बोदलवार सर यांच्या कडून देण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत आंबटपल्लीचे सरपंच उमेश माधव कळते होते.उपाध्यक्षस्थानी ग्रामपंचायत गोमनिचे सदस्य शुभम शेंडे होते.प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य अजयभाऊ नैताम,माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम होते.

यावेळी उपस्थित माजी सरपंच प्रमोद आत्राम,ग्राम पंचायत सदस्य कालिदास भाऊ कुसनाके कोठारी,राजेश भाऊ दुर्गे महागाव, वेलगुरचे माजी ग्राम पंचायत सरपंच अशोकभाऊ येलमुले,ग्राम पंचायत चुटूगुंटा उपसरपंच सुरेश आत्राम ,तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकटेश धानोरकर, सामजिक कार्यकर्ते नरेंद्र गरगम, दिवाकर आलामसह आविसं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here