Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कब्बड्डी स्पर्धेचे...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन

60
0

मुलचेरा : तालुक्यातील वेंगनूर येथील जय अडेकसा क्रिडा मंडळ वेंगनूर यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कब्बड्डी स्पर्धेची आयोजित केली आहे.सदर या कब्बड्डी स्पर्धेची आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

कब्बड्डी स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तसेच या स्पर्धेसाठी द्वितीय – तृतीय पारितोषिक देण्यात येत आहे.

या कार्यक्रमाची अध्यक्ष म्हणून आविसं व ग्रामसभा तालुका अध्यक्ष एटापल्ली नंदू मट्टामी होते.सह उदघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी – देवदा ग्रामपंचायतचे सरपंच केसरी तेलामी होते.

यावेळी उदघाटन प्रसंगी नरेश कांदो उपसरपंच ग्रा.प.वेगनूर,संतोष तुमरेट्टी उपसरपंच ग्रा.प.देवदा,वनिता तिम्मा ग्रा.प.सदस्य बोलेपल्ली,मुनेश्वर गावडे माजी सरपंच ग्रा.प.वेंगनुर,सोन्या पाटील गावडे पोलीस पाटील वेंगनुर,कमलेश सरकार,प्रमोद गोटेववार राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष मुलचेरा,रवी झाडे,रंजन बिश्वास,नरेश रापंजी, परसा साहेब वनरक्षक ,कावडे सर जि.प.शाळा वेंगनुर,सुरेखा लोहबले आंगणवाडी सेविका वेंगनुर,बाबुराव दुर्वा,दिलीप नरोटे,बाबुराव दुर्वा,चिंटूभाऊ आत्राम,प्रमोद गोडसेलवार सह गावकरी नागरीक खेळाडू तसेच मंडळाचे अध्यक्ष मुनेश्वर नरोटे,उपाध्यक्ष :-मुलाजी कांदो,तुळशीराम मडावी,सचिव:-भिकाराम पल्लो,अशोक गोटा,सहसचिव:-गिरमा गोटा,पिंटू म्रीधा, कोषाध्यक्ष:-सुरेश मडावी,साईनाथ मडावी,सहसयोजक:-विलास कांदो,बोचा कांदो उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here