अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक महेशभाऊ दहागांवकर यांनी आलापल्ली श्रीमिक नगर फ़ॉरेस्ट टेकडी कॉलनी वार्ड नंबर एक येथे नुकतेच नवीन घराचे गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित केले होते.गृहप्रवेश कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस समन्वयक अहेरी विधानसभा क्षेत्र व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून दहागांवकर कुटुंबियांना शुभेच्छा देत भेट वस्तू दिले.
यावेळी मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,अनिलभाऊसह दहागांवकर कुटुंबातील सदस्य तसेच काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Home आलापल्ली माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व काँग्रेसनेते हनमंतु मडावी यांनी गृहप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित