अहेरी : तालुक्यातील किष्ठापुर येथील माजी सरपंच भगवान आत्राम यांचे वडील कलमशाई आत्राम यांचे वृद्धापकाळाने दुःखत निधन झाले होते.आज तेरवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर तेरवी कार्यक्रमाला आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेल जिल्हा अध्यक्ष हणमंत मडावी यांनी उपस्थित राहून आत्राम परिवाराचे सांत्वन केले.
यावेळी आविसं काँग्रेसचे पदाधिकारी तथा अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,हरिदास आत्राम,भगवान आत्राम,महेश अर्का,प्रकाश दुर्गेसह स्थानिक आविसं काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक – आत्राम परिवारचे नातेवाईक सदस्य उपस्थित होते.