सिरोंचा : तालुक्यांतील सिरकोंडा येथील रहिवाशी पेंटी वंजा गावडे,इपो कोरके गावडे यांचा दुखत निधन झाले होते.आज तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहे.सदर तेरवी कार्यक्रमाला आदिवासी विध्यार्थी संघचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षचे प्रमुख नेते बानय्याभाऊ जनगाम यांनी उपस्थित राहून गावडे कुटुंबाचा सांत्वन केले.
यावेळी सरपंच लक्ष्मण गावडे,समय्या वरसे,सूर्यभाई गावडे,लक्ष्मण बोल्ले,गणेश राच्चवार,राजेश पडला,सुरेश जाडी,शंकर मडावीसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावडे परिवारातील सदस्य नातेवाईक उपस्थित होते.