Home सिरोंचा ‘त्यां’च्या मार्गदर्शनातच घेतला समाजकार्याचा वसा : नगरअध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी फादर्स डे...

‘त्यां’च्या मार्गदर्शनातच घेतला समाजकार्याचा वसा : नगरअध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी फादर्स डे निमित्याने व्यक्त केली वाडीलांप्रति कृतज्ञता

74
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / सिरोंचा तालुका प्रतिनिधी ( SIRONCHA )

सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटचा टोक असलेल्या अतिसंवेदनशील, अविकसित, आदिवासीबहुल क्षेत्रात वास्तव्यास असताना प्रतिकूल परिस्थितीत येथील आदिवासी, सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत गरजांसाठीचा संघर्ष बघताना वडिल हळहळ व्यक्त करीत होते. या सर्वसामान्य नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचे वडील गफर पाशा नेहमीच प्रयत्नशील होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही प्रारंभी समाजकार्यात व त्यानंतर राजकारणातून सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. याच प्रयत्नातून आज सिरोंचा नगरपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून प्रारंभी शहर विकासाचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. राजकारणातून समाजकार्य करीत सर्वसामान्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. वडिलांनी दाखविलेल्या मार्गातून सर्वसामान्य, गोरगरीब, आदिवासींचे प्रश्न सोडवीत असतानाच सदर मार्ग दाखविण्या-या वडिलांप्रती ‘फादर्स डे’ निमित्त सिरोंचा नपंचे अध्यक्ष फरजाना इफ्तेखार शेख आणि उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here