Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभहस्ते नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन संपन्न

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभहस्ते नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन संपन्न

67
0

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय खाँदला अंतर्गत येत असलेल्या गोलाकर्जी येते जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत जिल्हा वार्षिक योजन सन २०२१-२२ अंतर्गत नवीन अंगणवाडी खोलीचे बांधकाम मंजूर झाले होते.आज सदर अंगणवाडी बांधकाम पूर्णत्वास झाल्यामुळे अंगणवाडी बालकांना बसण्यासाठी म्हणून सदर अंगणवाडीची उद्घाटन आज आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यानवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,खाँदला ग्रामपंचायतचे उपसरपंच राकेश सिडाम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्रामपंचायत सदस्या अरुणा सड़मेक,खाँदलाचे माजी सरपंचा लक्ष्मी श्रीरामवार,राजारामचे माजी उपसरपंच संजय पोरतेट,माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर आत्राम,पाटील बिचू मडावी,पाटील मूत्ता पोरतेट,अँड.एच.के.आकदर,श्रीनिवास राऊत,वसंत सड़मेक,दिपक अर्का,सुरेश सोयाम,नारायण चालुरकर,नामदेव पेंदाम,संतोष श्रीरामवार,चंद्र आत्राम,सचिव कु.एस.सड़मेक,अंगणवाडी सेविका संगीता आत्राम,कर्मचारी वेंकटेश अलोने,नरेंद्र गरगम,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील पुरुष-महिला व बालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here