Home आलापल्ली आल्लापल्ली येथील लोकमत संखी मंच कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार दांपत्याची प्रमुख...

आल्लापल्ली येथील लोकमत संखी मंच कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार दांपत्याची प्रमुख उपस्थिती

68
0

अहेरी : तालुक्यातील आल्लापल्ली येथे दैनिक लोकमत वृत्तपत्र समूहाकडून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा स्वातंत्र्य दिना निमित्याने लोकमत सखी मंच कार्यक्रमाचे थाटात आयोजन करण्यात आला.सदर कार्यक्रम अहेरी व आल्लापल्ली येथील सखींकडून संयुक्तपणे आल्लापल्ली येथे आयोजित करण्यात आला.लोकमत संखी मंच अहेरी व आलापल्ली कडून आयोजित सखी मंच कार्यक्रमाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व सौ.सोनाली अजयभाऊ कंकडालवार या दांपत्याची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी लोकमत सखी मंचकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात देशाचा मानबिंदू असलेल्या तिरंगा ध्वज सखींनी हातात घेऊन देशभक्तीपर आधारित भजन व कीर्तनाची स्मरण करीत केक कापून स्वातंत्र्य दिनाचे जल्लोष साजरा केले.लोकमत सखी मंच आलापल्ली व अहेरी यांदोन्ही शहाराकडून संयुक्तपणे कार्यक्रम साजरा करण्यात आली.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करतांना उपस्थित सखींना त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सुख दुःखात आपण खंबीरपणे पाठीशी राहणार असल्याचे उपस्थित सखींना ग्वाही दिली.तर अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनीसुद्धा उपस्थित सखींना मोलाचे मार्गदर्शन केल्या.अहेरी व आल्लापल्ली संयुक्तपणे आयोजित लोकमत सखी मंच महोत्सवाला दोन्ही शहरातील सखी व भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती.खेळीमय वातावरणात लोकमत सखी मंच महोत्सव पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here