Home सिरोंचा महाराष्ट्राचे शेवटची टोकं व तीन राज्यांच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सिरोंचा शहराला जिल्हा...

महाराष्ट्राचे शेवटची टोकं व तीन राज्यांच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सिरोंचा शहराला जिल्हा बनविण्याची मागणी

50
0

सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून महाराष्ट्र राज्याचे दक्षिण भागात शेवटच्या टोकावर वसलेल्या व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही समतोल विकासासह भौतिक सुविधेपासून कोसो दूर असलेल्या आणि तीन राज्यांच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ऐतिहासीक शहर म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या सिरोंचा शहराला नवीन जिल्हा बनविण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.सिरोंचा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते किरणकुमार वेमुला,सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लम व अंकिसा येथील युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन तालुक्यातील शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन येथील तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांच्यामार्फतीने राज्याचे मुख्यमंत्र्यांना पाठवून वरील मागणी केली आहे.

सिरोंचाचे तहसीलदार शिकतोडे यांच्यामार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात.”सिरोंचा शहर हे तेलंगणा”छत्तीसगड व आंध्रप्रदेश या तीन राज्यांच्या मध्यवर्ती ठिकाण असून राज्याचे शेवटचे टोकं आहे,या तालुक्याची समतोल विकास घडवून आणण्यात सरकारांना अपयश आल्याने या तालुक्याची जलदगतीने विकास व्हावे तालुक्यातील नागरिकांना भौतिक सुविधा मिळावे म्हणून सिरोंचा या इतिहासकालीन शहराला नव्याने जिल्हा बनविण्यात यावी.2) सिरोंचा तालुक्यातील वडधम ते पातागुडम पर्यंत राष्ट्रीय महामार्ग हे पूर्णतः खड्यांनी भरल्याने तात्काळ या महामार्गाचे कामाला सुरुवात करण्यात यावी.3)सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा क्षेत्रातील कोटापल्ली येथे प्राणहिता नदीवर पुलाची बांधकाम मंजूर करून पुलाची निर्मिती करण्यात यावी.4) सिरोंचा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मेडिगड्डा -कालेश्वर सिंचन प्रकल्पात आपल्या हक्काचे पाण्याचं वाट्यात वीज निर्मिती केंद्र मंजूर करण्यात यावी.5)सिरोंचा तालुक्यातील मेडिगड्डा-कालेश्वर सिंचन प्रकल्प बाधित गावांना तात्काळ प्रकल्पग्रस्त गावे घोषित करण्यात यावी.6)सिरोंचा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्मितीसाठी औदयोगिक वसाहत(M.I.D.C) मंजूर करण्यात यावी.7)सिरोंचा येथे नव्याने बसस्थानाकाची बांधकाम करण्यात यावी तसेच सिरोंचासाठी स्वतंत्र एस.टी बस आगार मंजूर करण्यात यावी.8)सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची बांधकाम करून रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी.9)सिरोंचा तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी.10)सिरोंचा तालुक्यातील महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी सिरोंचा येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करण्यात यावी.11)सिरोंचा तहसील हे धान उत्पादक तालुका असल्याने धान साठवणुकीसाठी गोदमाची कमतरता भासत आहे.कृपया आवश्यक ठिकाणी नव्याने गोदामाची बांधकाम
करण्यात यावी.12)सिरोंचा तालुक्यातील विद्युत समस्या निकाली काढण्यासाठी विद्युत टॉवर लाईन मंजूर करून कामाला तात्काळ सुरुवात करण्यात यावी.13)सिरोंचा तालुक्यातील 39 ग्राम पंचायतींना विकास कामांसाठी जादा निधीची उपलब्ध करून देण्यात यावी.14)सिरोंचा शहरात मागील अनेक वर्षांपासून घरे बांधून वास्तव्य करणारे सर्व अतिक्रमण धारकांना कायम पट्टे देण्यात यावी.15) सिरोंचा ते आल्लापल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे कामाला वेळ लागणार असल्याने चंद्रपूर आगारातून तेलंगणा मार्गे सिरोंचासाठी बसेस सुरू करण्यात यावी.16)सिरोंचा तालुक्यात बंद असलेलं रेगुंठा,पातागुडम,जाफराबाद ,झिंगाणूर ला बससेवा तात्काळ सुरू करून शालेय विद्यार्थ्यांसाठी जादा बसेस सोडण्यात यावी.17)सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयाची श्रेणीवर्धन करून 100 खाटांची उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून तात्काळ पदनिर्मिती करून पदे भरण्यात यावी.18)सिरोंचा तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय अधिकारी(महसूल)कार्यालय मंजूर करून कामकाजाला सुरुवात करण्यात यावी.19)सिरोंचा तालुक्यात आलेलं महापूर व मुसळधार पावसामुळे अनेक गावातील नाल्यावरील पूल तुटल्याने त्या गावांची तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटलेल्या आहे.कृपया त्या सर्व ठिकाणी पुलांची दुरुस्ती करावी व नवीन पुलाची मंजूर करण्यात यावी.20) गडचिरोली जिल्ह्यात अहेरी व सिरोंचा या दोन तालुक्यात अल्पसंख्येने आदिवासी मन्नेवार समाज वास्तव्याने आहे.आजपर्यंत या समाजातील एकही नागरिकाला जातवैधता प्रमाणपत्र मिळाले नाही,कृपया राज्यसरकार यात दखल घेऊन मन्नेवार समाजाला आदिवासी असल्याबाबतचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात यावी.21)तालुक्यातील 39 ग्राम पंचायतींना इंटरनेट सुविधेनी जोडण्यात यावी तसेच निवेदनात,वरील सर्व समस्या व मागण्या हे सिरोंचा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवन मरणाशी निगडित असून आणि त्याची पूर्तता करणे नितांत आवश्यक आहे.तरी आपण सरकारकडून आणि आपल्या स्तरावरून या सर्व समस्या व मागण्यांप्रति सकारात्मक पाऊलं उचलून तात्काळ सोडविण्याची प्रयत्न करावे.जर सरकार व आपल्यास्तरा वरून सिरोंचा तालुक्यातील सर्व समस्यां व मागण्यांची सोडवणुकीसाठी लवकर सकारात्मक पाऊलं न उचलल्यास आम्हाला नाईलाजास्तव सरकार व संबंधित यंत्रणेविरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची इशाराही निवेदनातून सरकारला दिली आहे.तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह अनेक मंत्री व संबंधित सनद अधिकाऱ्यांना निवेदन सादर करतांना सामाजिक कार्यकर्ते किरणकुमार वेमुला,माजी सरपंच रवी सल्लम,सुरजभाऊ दुदीवार,श्रीनिवास मुलकाला,संपत गोगुलासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here