Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते सुगमसंगीत...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते सुगमसंगीत कार्यक्रमाचे उदघाटन

47
0

अहेरी : येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.काल अहेरी येथील आदर्श दुर्गात्सव मंडळ तर्फे सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले असता सदर सुगम संगीत कार्यक्रमाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दुर्गा मंडळला भेट देऊन दुर्गा देवीचे विधिवत पूजा अर्चना करून सुगम संगीत कार्यक्रमाचे उदघाटन केले.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,नरेंद्र गर्गम, कुमार गुरनुले,अजय सडमेक,महेश गेडाम,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवारसह आदर्श दुर्गोत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्यगण तसेच आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here