Home सामाजिक संगीत नाटक हे मानवी जीवनावर लक्ष केंद्रित करून जीवनाचे प्रतिबिंब उमठवीत असतात...

संगीत नाटक हे मानवी जीवनावर लक्ष केंद्रित करून जीवनाचे प्रतिबिंब उमठवीत असतात : अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन

65
0

एटापल्ली : शहरी भागात विविध सामाजिक संस्था व क्रिडा मंडळांकडून नाट्यरसिकांचे मनोरंजनासाठी तसेच समाज प्रबोधन व समाज जागृतीसाठी भिन्न भिन्न नाट्यप्रयोगाचे आयोजन करीत असतात.याच धर्तीवर एटापल्ली त विर बाबुराव शेडमाके नाट्य कला मंडळ एटापल्ली यांच्या सौजन्याने संगीत नाटक ( यातना ) नावाचं नाट्यप्रयोगाचे बंद शामियानात आयोजन करण्यात आली.

या संगीत नाटकाचे उदघाटन जि.प.माजी अध्यक्ष,आविस व काँग्रेसचे नेते व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आला.

संगीत नाटकाचे उदघाटक म्हणून उपस्थित नाट्यरसिकांना मार्गदर्शन करतांना अजयभाऊ कंकडालवार म्हणाले,नाटक म्हणजे जिवंत,मृत,पौराणिक,ऐतिहासि,काल्पनिक व्यक्ती यांच्या भूमिका करणाऱ्या नटानीं रंगमंचावर सादर केलेली संवादात्मक,अभिनयमय,नृत्यमय आणि काव्यात्मकता म्हणजेच नाटक असून नाटकाचे अनेक प्रकार असून यात संगीत नाटकाला आजही अनन्य महत्व आहे,नाटक आणि ग्रामीण समाजाचा विकास हे एक कला प्रकार म्हणून मानवी जीवनावर लक्ष केंद्रित करून प्रतिबिंब उमठवीत असतात,असे बहुमूल्य मार्गदर्शन त्यांनी केले.

संगीत नाटकाचे उदघाटन प्रसंगी पुढे बोलतांना कंकडालवार म्हणाले,नाटक हे एक जिवंत सांप्रदायिक कला असून त्यात संगीत नाटक हे मराठी रंगभूमीचे खास वैशिष्ट्य आहेत.रंगमंचावर सादर करणाऱ्या नाटकातुन प्रत्येक नाट्यकलावंत हे अनेक पात्रांतून कथाकथनाचे कार्य करीत असतात.

यावेळी आदिवासी कॉग्रेस सेलचे जि.अध्यक्ष तसेच सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक मा.हनमंतू जी.मडावी,एटापल्ली सचिव प्रज्वल नागूलवार,एटापल्ली नगरपंचायतचे नगरसेवक नामदेव हेचमी,अविका सचिव प्रशांत टेकूलकार,शिवसेना तालुका प्रमुख मनिष दुर्गे,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगमस्वप्नील मडावी,श्रीकांत कोकुलवार,पुणेश कंदिकूरवार, परिसरातील आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here