Home मुख्य बातम्या एटापल्ली नगर पंचायत विषय समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व

एटापल्ली नगर पंचायत विषय समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व

67
0

एटापल्ली : नगरपंचायत ची विषय समित्यांची निवडणूक उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी आदित्य जीवने (भाप्रसे) पीठासीन अधिकारी म्हणून नायब तहसीलदार प्रवीण चौधरी व नगर पंचायतचे मुख्याधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.या निवडणुकीत स्वच्छता व आरोग्य समीती सभापती म्हणून मिनाताई नागूलवार उपाध्यक्ष नगरपंचायत तर बांधकाम समीतीचे सभापती म्हणून राघवेंद्र सुल्वावार आणि पाणी पुरवठा व जलनीस:रण सभापती म्हणून नामदेव हीचामी तर महीला व बालकल्याण समीती सभापती म्हणून जानोताई भीमराव गावडे अविरोध निवडून आले.

अध्यक्षा दीपयंती पेंदाम नगरसेवक तथा गटनेता निजान भाउ पेंदाम,राहुल कुळमेथे,शालीनी कुंभारे,तारा गावडे,कवीता रावलकर,बिरजु तीम्मा,किसनजी हिचामी या नगरसेवकांच्या मदतीने विषय समित्यांचे सभापती पदे अविरोध निवडुण आले आहे.एटापल्ली तालुक्याचे काँग्रेस कमेटी अध्यक्ष रमेश गंपावार,आवीस सचीव तथा काँग्रेस नेते एटापल्ली तालुका एटापल्ली प्रज्वल नागुलवार,कार्यकर्ते लोकेश गावडे,अनील करमरकर,राकेश समुद्रलवार,सतीश मुप्पलवार मनीष दुर्गे,अक्षय पुंगाटीसह कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here