Home अहेरी खाली जागेत धान खरेदी करा : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे शेतकऱ्यांनी...

खाली जागेत धान खरेदी करा : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली निवेदनातून मागणी

16
0

एटापल्ली : तालुक्यातील हेडरी व उडेरा अंतर्गत येत असलेल्या कांदोळी येथील धान खरेदी केंद्राचे गोडाऊन पुर्ण भरले आहे.दोन तीन दिवस शेतकऱ्यांचे धान खरेदी केले आता धान साठवून ठेवण्यासाठी जागा नसल्याने हेडरी येथील शेतकऱ्यांना उडेरा येथे धान खरेदी केंद्रावर नेण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.

                म्हणून खाली जागेत धान खरेदी केले जावे याकरिता आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्याकडे हेडरी – उडेरा येथील शेतकऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.

                नेहमी सुखा दुःखात व सामान्य नागरिकांच्या,शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अहेरी उपविभागत अजय कंकडालवार हे सदैव काम करत असल्याने या अहेरी उपविभातील जनता कंकडालवार यांच्याकडे आपली समस्या घेऊन आणि ते सोडवितात त्याकरिता आम्ही आमच्या समस्या घेऊन आलोय आणि अजयभाऊ आमची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील त्याकरिता निवेदन देऊन विनंती केली असल्याचे हेडरी व उडेरा येथील शेतकऱ्यांनी सांगितले

यावेळी निवेदन देतांना आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,रामा मडावी,डोलेश मडावी,संजय मडावी,कोको मडावी,रैनू नरोटे,लालसू आत्राम,पंजा मडावी,रैनू उसेंडी,सातू मडावी,मालू मडावी, इरपा आत्राम,गणू आत्राम,मधू मडावी,वारलू तलांडे,राजू मडावी,अशोक मडावी, बाबुराव आत्राम,महेश आत्राम,मनोज मडावी,साईनाथ मडावी,राजेश मडावी,लालू मडावी,बंडू मडावी,नरेश गर्गमसह स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच हेडरी – उडेरा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here