Home अहेरी शेतात काम करताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

शेतात काम करताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

2
0

अहेरी : तालुक्यातील चंद्रा येथील रहिवासी साईनाथ मुत्ता तलंडी (वय ४३) यांचा शेतात काम करत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे.

घटनेनंतर नातेवाईकांनी त्यांना तत्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी आणले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.डॉ.अजय कंकडालवार यांनी पुढाकार घेत पोस्टमार्टमसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले तसेच मृतदेह घरी नेण्यासाठी वाहनाची (घडीची) व्यवस्था केली.

याशिवाय, रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांसाठी जेवणाचीही सुविधा करण्यात आली.अजय कंकडालवार यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here