Home आलापल्ली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलापल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलापल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक

6
0

एटापल्ली : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलापल्ली येथे एटापल्ली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली.या बैठकीला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणमंतु मडावी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

तालुक्यातील स्थानिक विकास आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा करताना कंकडालवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.आगामी निवडणुका लक्षात घेता संघटनात्मक मजबुती,प्रचाराचे नियोजन आणि मतदारांशी संवाद वाढवण्यावर भर देण्यात आला.

बैठकीला तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी,स्थानिक कार्यकर्ते व युवा नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकत्रितपणे काम करून तालुक्यातील सर्व जागा जिंकण्याचा निर्धार या बैठकीतून व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here