Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी क्रिकेट स्पर्धेचे...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

38
0

अहेरी : तालुक्यातील छालेवाडा येथील बंजारा क्रिकेट क्लब बंजारा मौला द्वारा भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजित केले आहे.या क्रिकेट स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

हा क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक रेपानपल्ली ग्रामपंचायत कडून देण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे सहउदघाटन म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी,कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून रेपानपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मी मडावी होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य अजय नैताम – रेपानपल्ली ग्रामपंचायतचे सचिव बाटवे साहेब – सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत रेपानपल्ली होते.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी सभापती सुरेखा आलम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपल्ली ग्रामपंचायतचे कार्तिक तोगम,उपसरपंच संजय पोर्तेट,नामदेव पेंदाम,विलास बोरकर, राहुल संदिला,गुलाब डेवगडे,हणमंत ठाकरे,श्रीनिवास लेंडगुरे,लक्ष्मी चव्हाण,दासू कामले,लक्ष्मण जनगमसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंडळाचे पदाधिकारी सदस्य – गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here