निवेदनात अशी म्हंटले की”एटापल्ली : तालुक्यातील गेदा येथून आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत गेदा येथील खरेदी सुरु केले असून गेदा व चंदनवेली गावात उपलब्ध असलेल्या गोटूल भावन – ग्रामपंचायत दुकान गाळे – कृषि गोदाम खरेदी करिता गावकर्यांनी महामंडळाला उपलब्ध करून दिले.व या ठिकाणी खरेदी करण्यात आली आणि.हे संपूर्ण गोदामे भरले.
गोदाम भरले म्हणून महामंडळ खरेदी केंद्र बंद करून ठेवले.एटापल्ली तालुक्यात अनेक ठिकाणी महामंडळाचे खरेदी केंद्र सुरु असून प्रत्येक ठिकाणी उघड्यावर धान खरेदी सुरु असून गेदा येथेच खरेदी का करण्यात येत नाही आहे.गेदा कार्यक्षेत्रातील कास्तकारांना शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवण्यात प्रकार महामंडळा कडून सुरु आहे.गेदा येथील कार्यक्षेत्रातील संपूर्ण कास्तकारांना महामंडळाला गेदा येथील जनावरांचा दवाखाना असलेल्या परिसरात धान खरेदी करिता जागा देण्याचे ठरविले.
सदर जागेला चारही दिशेने पक्के विटा सिमेंटचे संरक्षण भिंती बांधलेले आहे.याबाबत अहेरी उपप्रादेशिक व्यवस्थापकांची गावातील प्रतिष्ठित कास्तकार प्रत्येक्षात भेटून चर्चा केली असतं.गेदा येथे जागा उपलब्ध करून द्या आम्ही उघड्यावर खरेदी करू असे आश्वासन दिले.
परंतु अजून पर्यंत खरेदी केली नाही.शासनाच्या आधारभूत खरेदी अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 पर्यंत असून अजून अंदाजे 100 ते 120 शेतकऱ्यांनी धान विक्री केलेले नाही.सदरचे खरेदी केंद्र बंद करून आम्हा कास्तकारांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरु आहे.
तरी सदर प्रकरणी गंभीर दखल घेऊन त्वरित खरेदी केंद्र सुरु करण्याची कार्यवाही करण्यात यावी ही विनंती.अन्यथा आम्ही सर्व कास्तकारांनी रस्त्यावर उतरून शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू तरी वरिष्ठाना विनंती करण्यात येते की 2 दिवसात खरेदी केंद्र सुरु करण्याची कार्यवाही करण्यात यावी किंवा दिनांक 28 जानेवारी 2024 पासून आम्हा सर्व कास्तकारांनी रस्ता रोको व चक्का जाम आंदोलन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी निवेदनात म्हंटले आहे.यावेळी निवेदन देतांना समस्त गावकरी – महिला वर्गा उपस्थित होते.