Home मुख्य बातम्या माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या स्वखर्चाने होणार मदनम पोचम्मा मंदिर

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या स्वखर्चाने होणार मदनम पोचम्मा मंदिर

61
0

मुलचेरा : तालुक्यातील येल्ला येथील मदनम पोचम्मा मंदिर नसल्यामुळे प्रत्येक वर्गतील समाज बांधवाना उत्साहात कार्यक्रम घेण्यासाठी अडचण भसत होते.प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल,सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्व प्रथम माता मंदिरत जावून पूजा अर्चना करूनच बाकीचे कार्यक्रम पार पडत असतात.

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मुलचेरा तालुक्यात येल्ला येथील दौऱ्यावर घेले होते.दौऱ्यावेळी गावातील सर्व नागरिक मदनम पोचम्मा मंदिर नसल्यामुळे कशा प्रकारचे अडचण भसत होते सांगितले.गावातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन यांनी शासन कडून आताचे आता माता मंदिर साठी निधी उपलब्ध होत नाही.मात्र मी स्वखर्चाने मदनम पोचम्मा मंदिर बांधून देतो अशी ग्वाही दिले.

ओडेवार समाज येल्ला गाववासियांनी मदनम पोचम्मा मंदिर भूमिपूजन सोहळ्याला फेब्रुवारी रविवारी रोजी ठरवल्याने सदर मदनम पोचम्मा मंदिर बांधकामाचे भूमिपूजन आविसं’काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आली आहे.त्यावेळी येथील नागरिकांन कडून काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या सत्कार करण्यात आली.

यावेळी परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच येल्ला येथील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here