गडचिरोली: ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतीकडून ग्रामसभा घेऊन ग्रामविज सेवकाची नियुक्ती सन २०१६ ते २०१७ व २०१७ ते २०१८ या दोन वर्षासाठी अकरा महिन्याकरीता मासिक पाच हजार रु.मानधनावर नेमण्यात आले होते. व ग्रामविज सेवक आपल्या नियुक्तीपासून कर्तुत्वावर इमाने इतबारे आपले काम पार पाडत आहेत.
परंतु ग्रामविज सेवक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.ग्राम वीज सेवकांची समस्यांची सोडवणुक करण्यासाठी आपल्या स्तरावरून शासन व प्रशासनाकडे योग्य पाठपुरावा करून ग्राम वीज सेवकांची समस्या सोडवणुकीत आपल्या हातभार लावण्याची विनंती ग्राम रोजगार सेवकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ग्राम सेवकांनी माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कंकडालवार यांना दिलेल्या निवेदनात,गडचिरोली जिल्हयातील सात तालुक्यातील रिक्त असलेल्या विज सेवकांच्या जागा तात्काळ भरण्यात याव्यात.ग्रामविज सेवकांची मागील वर्षीचे मानधन त्वरीत देण्यात यावे.ग्रामविज सेवकांचे मासिक मानधन आमपंचायतला न देता, जि.प.च्या कॅफो तर्फे ग्रामविज सेवकांच्या बँक खात्यात जमा करण्यात याव्यात.दिनांक २०/१०/२०१६ च्या शासननिर्णयात अंशतः बदल करून गडचिरोली जिल्हयातील ७ तालुके वगळण्यात यावी,ग्रामविज सेवकांना ग्राम पंचायत व्यतीरिक्त D.O. फ्युज कॉल करणे, मोठी लाईन दुरूस्ती करणे इ.कामे करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे.तसेच ग्रामवीज सेवकांना ओळखपत्र देण्यात यावे प्रामवीज सेवकांना दोन ड्रेस व १ टुल किट देण्यात यावे,सर्व ग्रामवीज सेवकांचा विमा काढण्यात यावा, आदि समस्यांची समावेश आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी ग्राम वीज सेवकांना,आपल्या समस्यांची सोडवणूकीसाठी आपण शासन दरबारी सर्वतोपारी प्रयत्न करणार असल्याचे सकारात्मक आश्वासन दिले.
Home मुख्य बातम्या गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामविज सेवकांची समस्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी