Home मुख्य बातम्या जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत विना परवानगीने सुरू असलेल्या अवैध बांधकामांची चौकशी करा

जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत विना परवानगीने सुरू असलेल्या अवैध बांधकामांची चौकशी करा

26
0

गडचिरोली : जिल्ह्यात पाटबंधारे विभागाअंतर्गत विना परवानगीने सुरू असलेले अवैध बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या या बांधकामाबाबत काही नागरिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिले. कंकडालवार यांनी हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची शहानिशा केली असून या कामांची पूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

झालेल्या कामापैकी अनेक कामे तीन वर्षांपूर्वीची आहेत. त्या कामांची आणि सध्या चालू असलेल्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार होत आहे. तीन वर्षापूर्वी बांधलेले काही बंधारे पहिल्याच पावसात वाहून घेले तर काही बंधारे क्रॅक झाले आहे. प्रशासनाचे यावर कोणतेही लक्ष नाही. त्याकरिता तीन वर्षापूर्वी झालेले सर्व बंधाऱ्यांच्या कामांची आणि सध्या चालू असलेल्या बंधाऱ्यांच्या बांधकामांची संपूर्ण चौकशी करावी, अन्यथा पाटबंधारे कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अजय कंकडालवार यांनी दिला आहे.

पाटबंधारे विभाग, लघुपाटबंधारे विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या कोट्यवधीच्या बंधाऱ्यांच्या कामांचा नित्कृष्ट दर्जा आहे. शासनाच्या नियमानुसार बरोबर खोलीकरण होत नाही. जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here