Home मुख्य बातम्या अपघातात जखमींना मूलकला फाउंडेशनकडून मदतीचा हात

अपघातात जखमींना मूलकला फाउंडेशनकडून मदतीचा हात

122
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / सिरोंचा तालुका प्रतिनिधी

सिरोंचा तालुक्यातील चिटूर येथून शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमावरून परत येत असताना दुब्बापल्ली गावाजवळ ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन महिला ठार तर 30 ऊन अधिक जण जखमी झाल्याची घटना दिनांक 26 एप्रिल बुधवारी तीन वाजताच्या सुमारास रंगधामपेठा चेक गावाजवळ घडली. शासनाने विवीध योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकिय जत्रा शिबिर कार्यक्रम चिटुर येथे आयोजीत केले होते.या कार्यक्रमात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लक्ष्मीदेवपेठा येथील 30 जण ट्रॅक्टर मध्ये बसून चीटूरला गेली, कार्यक्रम आटोपून परत येत असताना दुपारी तीनच्या सुमारास रंगधामपेठा चेक गावाजवळ ट्रॅक्टर अनियत्रित. होऊन पलटी झाली, यात ट्रॅक्टर मध्ये बसलेले अनेक जण जखमी झाले. जखमींना मूलकला मदत फाउंडेशनच्या कार्यकर्ते – कल्याण मूलकला, राजेश तालरी, स्वामीराज मूलकला, राजू मूलकला यांच्या मदतीने तात्काळ अंकिसा प्राथमिक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, यातील 15 ते 16. जणांना प्रकृती गंभीर असून सिरोंचा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. यात दोन गंभीर जखमी असलेली महीला ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यातील जखमींची नावे अद्याप कळली नसुन हे सर्व जण लक्ष्मीदेवपेठा येथील रहिवासी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here