Home मुख्य बातम्या आविसंच्या माजी जिप.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवारसह हजारो कार्यकर्त्यांची काँग्रेसमध्ये प्रवेश केला

आविसंच्या माजी जिप.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवारसह हजारो कार्यकर्त्यांची काँग्रेसमध्ये प्रवेश केला

89
0

आलापल्ली : गडचिरोली जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे प्रमुख तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्यासह अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा, सिरोंचा,भामरागड,एटापल्ली”या”पाच तालुक्यातील आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पाच तालुक्याचे आविसं अध्यक्ष, सरपंच, नगर पंचायत अध्यक्ष आणि माजी सरपंच, उपसरपंच, सदस्यसह अहेरी विधानसभा क्षेत्रातील हजारो आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने 24 डिसेंबर रोजी आलापल्ली येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले असून अजयभाऊ कंकडालवार यांच्यासह आविसं व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,भाजपाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

काँग्रेसचे नेते महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेता तथा ब्रम्हपुरी विधानसभाचे लोकप्रिय आमदार विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या उपस्थितीत सर्वांनी आलापल्ली येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

आदिवासी विध्यार्थी संघटनेचे अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व नेते-कार्यकर्त्यांचं पक्षांतर झाल्यामुळे या विषयी एकच राजकीय चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणावरून आविसं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव वाढल्याची चिन्ह आहेत.
माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कंधेसमर्थक व कट्टर म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व सिरोंचा आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम अहेरी विधानसभा क्षेत्रातील आविसं चे कट्टर समर्थक समजले जाणारे आणि त्यांचे कुटुंबीय आदिवासी विध्यार्थी संघटना पक्षामधून राजकारण करत होते.
अखेर,आदिवासी विध्यार्थी संघटनेचे माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील आविसं चे तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते अनेक सरपंच व उपसरपंचसह आविसंला सोडचिठ्ठी दिली. 24 डिसेंबर रोजी भारतीय काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची घोषणा त्यांनी केली.त्यानुसार 24 डिसेंबरला महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश पार पडला.

आपल्या काँग्रेस पक्षातील प्रवेशाबाबत माहिती देताना अजयभाऊ कंकडालवार म्हणाले, “अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी आम्ही काम करत असून अजूनही काम करायचे आहे.महाविकास सरकार असताना त्यासाठी निधी व योजनांना मंजूरी दिली आहे.आणि त्यासाठी विरोधी पक्ष नेता विजयभाऊ वड्डेटीवार यांनी आपल्याला मदत केल्याची आठवण अजयभाऊ कंकडालवार यांनी केली.

आविसंचे अजयभाऊ कंकडालवार व पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या वाटेवर उघडपणे होते:

विशेष म्हणजे अजयभाऊ कंकडालवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व त्यांचे पत्नी माजी पंचायत समिती उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार आणि इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार आहेत.

“मी आणि माझा सर्व परिवार हा पिढीजात आविसंचे आहेत आणि होतो. पूर्वी आविसंचे पुढारी हे छोट्या मोठ्या सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत असत आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी देखील काम करीत असत पण मध्यंतरी काळातील पुढारी मात्र पक्ष वाढीसाठी नव्हे तर पक्ष संपवण्यासाठी काम करताय.आम्ही अहेरी विधानसभा क्षेत्राचा विकासासाठी अनेकदा आविसंच्या माजी आमदाराना अनेकदा जाऊन भेटलो पण काही उपयोग झाला नसून अहेरी विधानसभा क्षेत्राकडे त्यांचे लक्ष नसल्याचे,” आरोप माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालावर यांनी केलेत.

याविषयी बोलताना आदिवासी विध्यार्थी संघटनेचे एटापली तालुका अध्यक्ष मट्टमी म्हणाले, “आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढत होतो आणि आजही लढू अजयभाऊ यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उत्तम निर्णय घेतले असून विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या माध्यमाने आपल्या समस्या सोडवू आणि आपण जोमाने काम करणार.

आगामी निवडणुकीत माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना बसणार धक्का:
माजी आमदार दीपकदादा आत्राम यांचे कंधे समर्थक असलेले माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व सिरोंचा तालुका अविसं अध्यक्ष बानय्या जनगाम आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातील आविसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने अहेरी विधासभेत काँग्रेसचे फारडे जड झाले असून अहेरी विधासभेत माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना येणाऱ्या 2024 वर्षात येणाऱ्या निवडणुकीत धक्का बसणार असून काँग्रेसला नक्कीच फायदा होणार अशी चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here