Home अहेरी एसटी बस धावले गोमणीटोला व श्रीरामपूर परिसरात : अजयभाऊ कंकडालवार यांची माहितीची...

एसटी बस धावले गोमणीटोला व श्रीरामपूर परिसरात : अजयभाऊ कंकडालवार यांची माहितीची घेतले दाखल

22
0

मुलचेरा : तालुक्यातील गोमणीटोला व श्रीरामपूर परिसरातील एसटी बस फेरी बंद असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना व शालेय विध्यार्थ्यांना अडचण भासत होती.नागरिक कोणत्याही कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी खाजगी वाहन वापरकरावा लागत होती.तसेच विध्यार्थ्यांना शाळेत येण्या – जाण्यासाठी खूपच अडचण भासत होत होती.

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी मुलचेरा तालुका दौऱ्या दरम्यान गोमणीटोला व श्रीरामपूर परिसरातील नागरिक,शालेय विध्यार्थी बसची समस्या बाबत लक्षात आणून दिले होते.

अजय कंकडालवार दौऱ्यावेळी आगारातील प्रमुख अधिकाऱ्यांची दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्या परिसरातील एसटी बस बंद असल्याने नागरिकांना व विध्यार्थ्यांना अडचण भासत असल्याची अधिकाऱ्यांना लक्षत आणून दिले.तसेच लवकरत लवकर गोमणीटोला व श्रीरामपूर परिसरात एसटी बस फेरी सुरु करण्यात यावी म्हणून आगारातील अधिकाऱ्यांना माहिती दिले असता.कंकडालवार दिलेले माहितीची दखल घेत अखेर त्या परिसरात एसटी बसफेरी सुरु केले.

बस फेरी सुरु झाल्याने नागरिक वेळेवार काम करून घेत आहे आणि शालेय विध्यार्थी वेळेवार शाळेत जाउन शिक्षण घेत आहे.बस सुरु करून दिल्याबद्दल गोमणीटोला व श्रीरामपूर परिसरातील समस्त नागरिक,शालेय विध्यार्थी अजय कंकडालवार यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here