Home मुख्य बातम्या श्री.विश्वब्राम्हणेद्रस्वामी मंदीरासाठी जागा राखिव ठेवण्याची मागणीची तात्काळ दखल घ्यावी – सतीश जवाजी

श्री.विश्वब्राम्हणेद्रस्वामी मंदीरासाठी जागा राखिव ठेवण्याची मागणीची तात्काळ दखल घ्यावी – सतीश जवाजी

12
0

सिरोंचा : नगरपंचायत हद्दीतील असरअल्ली रोडला लागून असलेल्या स्थित श्री विश्वब्राम्हणेद्रस्वामी मंदीर
शहरात मागील 30 वर्षापासून सिरोंचा नगरपंचायत अस्थित्वात येण्या अगोदर पासून सदर जागा राखीव आहे.सिरोंचा तालुक्यातील विश्वकर्मा समाज बांधवाचे श्री विश्वब्राम्हणेद्रस्वामी मंदीर जीवालयाचे आस्थेचे प्रतिक आणि आध्यामिक प्रतिक आहे. तसेच नित्य पुजापाठ व इतर धर्मिक कार्यक्रम निरंतर होत आहेत.श्री विश्वब्राम्हणेद्रस्वामी मंदीरात नियमित चालत असलेल्या भजन, हवण,व कलश यात्रा व विश्वकर्मा जयंती व इतर कार्यक्रम होत असतात व यासाठी हजारो विश्वकर्मा समाज बांधवा उपस्थित असतात ,
यासाठी मंदिर परिसरात मंदिर व इतर कार्यक्रमासाठी लागणारे जागेवर संरक्षण तार (भिंत) उभारणी केलेली आहे.सिरोंचा नगर पंचायत मार्फत विश्वकर्मा मंदिराच्या आरक्षीत जागेवर इतर कार्यालयाचे ( अग्नीशामक कार्यालय व इतर कार्यालयासाठी देण्यासाठी चर्चा सुरू असून 30 वर्षापासून आरक्षित असलेल्या जागेवर कोणत्येही कार्यालय उभारू नये. व तालुक्यातील विश्वकर्मा समाज बांधवाचे आध्यात्मिक श्रध्दा स्थान असलेले मंदिर व मंदिरला लागून असलेली खुली जागा समाजासाठी राखीव ठेवावे,करिता समाज बांधवाचे मने दुखवून नये असे विश्वकर्मा समाज बांधवानी तहसीलदार तसेच नगर पंचायत नगर अध्यक्ष यांच्याकडे निवेदन सादर करून मागणी करण्यात आले आहे.विश्वकर्मा समाज बांधवाची संबंधित प्रशासनानी दाखल घ्यावे.अन्यथा विश्वकर्मा समाज बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी तालुका कांग्रेस कमिटीकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे इशारा तालुका अध्यक्ष सतीश जवाजी यांनी पत्रकार परिषदेतुन दिली आहे.त्यावेळी विश्वकर्मा समाज बांधवासह कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here