Home मुख्य बातम्या गेदा येथील धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येणार

गेदा येथील धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येणार

70
0

एटापल्ली : तालुक्यातील गेदा येथे यावर्षी वरून ईश्वरा कृपेने मोठ्या प्रमाणात पाऊस पडला धानाची कटाई व मळणी सुरू झाली आहे.मात्र टी.डी.सी. अंतर्गत धान खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आपले मेहनतीने पिकविलेल्या धान खाजगी व्यापारीना कवडीमोल भावात विकावे लागत आहे.शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावा लागतो.त्यामुळे शासनाने तत्काळ धान खरेदी केंद्र सुरु करावे.अशी गेदा ग्रामपंचायतचे सदस्य रमेश वैरागाडे यांनी मागणी केली.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी धान पिकांची कापणी व मळणी जोमात सुरू केली आहे.पण धान खरेदी केंद्रचा काहीच पत्ता नाही ग्रामीण भागात प्रामुख्याने धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.कारण कि”या”भागात शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आहेत.त्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

दरवर्षी धान उत्पादक शेतकरी अनेक संकटात सापडतो यावर्षी तर पुरपरिस्थती व अनेक रोगांचा प्रादुर्भाव धान पिकावर झाला.तरी देखील शेती मशागतीकरिता खाजगी,सरकारी बँककडुन पिक कर्ज-सोने तारण व उसने-उधार करून शेतकरी शेती करतो.एवढे करून सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे व हक्काचे धान विक्री करण्यासाठी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र उपलब्ध नसतील तर धान कुणाला विकावा असा गंभीर प्रश्न धान उत्पादक शेतकरी बांधवांना पडला आहे.

त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खाजगी व्यापारीना कवडीमोल भावाने धान विक्री करावा लागतो.तसेच कसनसुर गेदा या भागातील सातबारा ऑनलाइन करण्यासाठी प्रती शेतकऱ्यांकडून ५० ते १०० रुपये घेण्यात येत आहे.त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.

धानाची कटाई व मळणी जोमात सुरू असल्याने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे जेणेकरून धान उत्पादक शेतकरी बांधवांना खाजगी व्यापाऱ्या कडुण होणारी पिळवणुक व आर्थिक लुट थांबवावी या करिता.शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य रमेशभाऊ वैरगाडे यांनी केले आहे.

लवकरात लवकर धान खरेदी सुरु ना झाल्यासं आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत सदस्य वैरागडे यांनी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवाणा घेऊन.टी.डी.सी.कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल.ग्रामपंचायत सदस्य रमेशभाऊ वैरागडे यांनी सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here