अहेरी : तालुक्यातील रेगुलवाही येथील आज आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी रेगुलवाही येते दौरा करून ग्रामीण भागातील नागरिकांची समस्या जाणून घेतले.
यावेळी गावातील नागरिकांनी गावात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या,गली रस्ते,नालीसह आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.तसेच येथील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले असता.समस्यांची निराकरण करण्यात येईल असे अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील नागरिकांना आश्वासन दिले.
यावेळी अजय नैताम माजी जि.प.सदस्य,लिंगा वेलादी माजी सरपंच मुळेवाही,श्रीनिवास तलांडे ग्रामसभा सचिव रेगुलवाही,गणपत नैताम,सिदु कुळमेथे,भगवान गावडे,मुत्ता मडावी,किस्टा नैताम,कमला नैताम,जगु कुळमेथे,प्रभाकर पेंदाम,राकेश गावडे,लच्चा गावडे,राकेश गावडे,सुरेश कुळमेथे,कृष्णा वेलादी,अमृताबाई आलाम,रमाबाई गावडे,लच्चा मडावी,समय्या कोडापे,राकेश कुळमेथे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायत माजी उपसरपंच कार्तिक तोगमसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.