Home मुख्य बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) कार्यकर्त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात...

राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) कार्यकर्त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश

19
0

अहेरी : तालुक्यातील देवलमरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोलपल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा अजित पावर गटचे विद्यमान आमदार व महाराट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.धर्मारावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक व गेल्या 15 वर्षांपासून राट्रावादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते शंकर चालूरकर,रंगू वेलदी,चंद्र सडमेक,वेंकटेश चालूरकर,भीमराव कोरेत,नयन चालूरकर,विजय पुल्लिंवार,सिद्धार्थ कोरेत,विशाल सोयामसह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षातील नाराजीमुळे मुळे त्यांच्या पक्षाला राम राम करत.

आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केले.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात सदर पक्षात प्रवेश घेतले असून नवनिर्वाचित कार्यकर्तांच्या शाल व दुप्पटा टाकून स्वागत केले आहे.

यावेळी अहेरी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष निसार ( पप्पू ) हकीम,देवलमरी ग्रामपंचायतचे सदस्य महेश लेकूर,श्रीनिवास राऊत,पुरषोत्तम आईलवार,दिवाकर गावडे,संजय गोंडे,कोमल सडमेक,शंकर बोरकूटसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here