Home मुख्य बातम्या काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांना विधानसभा निवडणुकीसमोर विरोधकांकडून राजकीयदृष्ट्या कमजोर करण्याचे राजकीय षडयंत्र

काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांना विधानसभा निवडणुकीसमोर विरोधकांकडून राजकीयदृष्ट्या कमजोर करण्याचे राजकीय षडयंत्र

18
0

गडचिरोली : शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द बाळगणारे तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रातील तमाम शोषित वंचित पिडीतांची नेहमी बाधा उचलणारे अजयभाऊ कंकडालवार यांना विरोधकांकडून विधानसभा निवडणुकी समोर राजकीय दृष्ट्या कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

वर्षानुवर्षं राजकीय सत्ता आपल्या हाती असून सुध्दा अहेरी विधानसभा क्षेत्रातल्या शेवटचं घटकाची प्रामाणिक सेवा करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या राजकीय नेत्यांकडून नियोजनबद्ध रित्या षडयंत्र सुरू आहेत.अहेरिची बाजार समितीवर   एकहाती सत्ता संपादन केल्यापासून तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रात इंडिया आघाडीचे उमेदवाराला मताधिक्य मिळवून दिल्यापासून कंकडालवारांचे राजकीय  विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

अहेरी विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस अजयभाऊंची राजकीय ताकद वाढत असल्याने विरोधक अजय भाऊंची राजकीय ताकद कमी करण्याचे प्रयत्न करीत आहे.

अजयभाऊंच्या समर्थकांना विविध लाभांचे आमिष दाखवीत फूट पाडण्याचे काम करीत आहे. जनतेच्या निवडणुकांमध्ये पराभव पत्करलेल्या राजकीय नेत्यांनी पैसे आणि नोकरीचे आमिष दाखवीत अजय कंकडलवार  विरुद्ध राजकीय षडयंत्र करीत असल्याचे चर्चेला आता उधाण आलेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here