Home अहेरी शिक्षणासोबत शाररिक विकास आणि सुदृढ आरोग्यही तितकेच महत्वाचे : अजयभाऊ कंकडालवार

शिक्षणासोबत शाररिक विकास आणि सुदृढ आरोग्यही तितकेच महत्वाचे : अजयभाऊ कंकडालवार

53
0

अहेरी तालुक्यातील बासागुडा येथील जय माँ मदनागिरी क्रीडा मंडळ येचली कडून टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या क्रिकेट स्पर्धेची उदघाटन काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आला.

या क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक येचली येथील सिव्हिल कॉन्टॅक्टर गणेश नागपूरवार यांच्या कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक येचली ग्रामपंचायतचे सरपंच कमला कुरसाम उपसरपंच संजय येजूलवार कडून देण्यात येत आहे.

या कार्यक्रमाची सह उदघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.अध्यक्ष म्हणून अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष डाॅ.निसार ( पप्पू ) हकीम आणि काँग्रेसचे नेते माजी सभापती भास्कर तलांडे होते.त्यावेळी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांची गावात आगमन होताच येथील नागरिकांकडून ढोल ताशाच्या गजराने जंगी स्वागत करण्यात आली.

या क्रिकेट सामन्याचा उदघाटन प्रसंगी पेरमिली ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रमोद आत्राम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,गडचिरोली जि.प.माजी सदस्य अजय नैताम,गणेश नागपुरवर,कमला कुसराम,संजय एजुलवार,प्रमोद कोडापे,नारायण तानसेल,रमेश पोरतेत,स्वामी दुर्गे,माणिकराव मडावी,जे.टी मडावी,सोमय्या एजुलवार,श्रीनिवास कुसराम,दीपक अर्का,विनोद दुन्नावर,मल्लया पुजलवार,शरद कोरेत,चिन्नू सिडाम,सुरेश निलम,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यसह परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here