अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी सिरोंचा
सिरोंचा तालुक्यातील तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या बहुचर्चित मेडिगड्डा धरणाच्या पाण्यामुळे नुकसान होत असलेल्या 12 गावातील पीडित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह विविध मागण्या घेऊन सिरोंचा तहसील कार्यालयासमोर 26 एप्रिल पासून साखळी उपोषणावर बसले आहेत.
त्यात यावर्षी मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर उन्हाळा सुरू असून मेडिगड्डा पीडित शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून मूलकला मदत फाऊंडेशनतर्फे उपोषनाचा सुरुवाती दिवसापासून मूलकला फाऊंडेशनचे अध्यक्ष – सागर भाऊ मूलकला यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत पिण्याच्या पाणीची सोय उपलब्ध करून दिली आहे.उन्हाळ्याच्या दिवसात मेडिगड्डा पीडित उपोषणकर्त्यासाठी थंड पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल उपोषणकर्त्यानी सागरभाऊ मूलकला यांचे आभार मानले आहे.त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते – वसंत डूरके यांच्यासह पीडित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.