Home सामाजिक कंकडालवारांचे “कौतूक”,आत्रामांवर “निशाना”….! वडेट्टीवार म्हणाले,अहेरी मतदारसंघात काॅग्रेसचाच उमेदवार

कंकडालवारांचे “कौतूक”,आत्रामांवर “निशाना”….! वडेट्टीवार म्हणाले,अहेरी मतदारसंघात काॅग्रेसचाच उमेदवार

5
0

आलापल्ली : अहेरीतील पितापुत्री एकच आहेत,हे धोकेबाज अनं खोकेबाजही आहेत.लोकांना मुर्ख बनविण्यासाठी त्यांची हि सर्व नौटंकी आहे.राजनगरी असलेल्या या भूमीला खडडेनगरी करणा-यांना आता त्यांची जागा दाखवून दया.अहेरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अजय कंकडावार यांच्या नेतृत्वात अहेरी विधानसभा मतदारसंघ हा काॅग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढेल अनं जिंकेलही.एकीकडे कंकडालवार यांचे कौतूक करतांना दुसरीकडे त्यांनी आत्राम परिवारावर निशाणा साधला. आता आपल्याच भागातील काॅग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आमदार होणार आहे.राज्यात महाविकास आघाडीचच सरकार येणार आहे.अशावेळी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याच्या सुचना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.आज दि. २९ रोजी अहेरी येथे काॅग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला यावेळी ते बोलत होते.

काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,अहेरी विधानसभा मतदारसंघाचे काॅग्रेसचे समन्वयक अजय कंकडालवार,हनुमंतू मडावी यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.आज काॅग्रेसने अहेरीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.गेल्या दिवसात याठिकाणी दोन मोठया सभा झाल्या.पण आज झालेला मेळाव्यातील गर्दी हि या मतदारसंघात काॅग्रेसच विजयी ठरणार हे दाखविणार असल्याचे व वडेट्टीवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत काॅग्रेसने अहेरी मतदारसंघात मोठया मतांची आघाडी घेतली.राज्यात यावेळी महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे.अशावेळी आता अहेरी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन आवश्यक आहे.आपला उमेदवार कोण असेल हे पक्षश्रेष्ठी ठरवितील पण या भागातील भूमीपूत्रच आता आमदार होणार आहे.हि काळया दगळावरची रेघ आहे.भाजपवाले संविधान बदलवायला निघाले होते.मोठया तो-यात चारशे पार चा नारा देत होते.पण देशातील जनतेनी यांचा 56 इंच वाला सिना 32 वर आणून ठेवला.यांची नौंटकी आता लोकांच्या लक्षात आली आहे.हे सरकार पुंजीवांदयाचे आहे.अडाणीला एवढे देउनही यांचे समाधान झाले नाहीत्यामुळे आता त्यांना शाळाही देण्यात येत आहे.पण आम्ही महाराष्ट्राचा सातबारा अडाणींच्या नावे करू देणार नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

कंकडालवारांचे कौतूक….
आपल्या भाषणातून वडेट्टीवार यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अजय कंकडालवार यांचे भरभरून कौतूक केले.अहेरी मतदारसंघात सत्ताधा-यांचे सामान्य नागरिकांकडे लक्ष नाही.त्यांच्या व्यथा,वेदंनाशी त्यांना काही घेणे देणे नाही.पण अजय कंकडालवार हे सामान्यांशी जुळून आहेत.गावागावातील अनेक गरीबांच्या मदतीसाठी ते नेहमीच तप्तर असतात.अनेक गरजूंना ते सातत्याने मदतीचा हात देत आहेत.अनेकांच्या सुखदुखात भावाप्रमाणे ते धावून जात आपली जबाबदारी पार पाडत आहेत.येथील जनता त्यांच्या पाठीशी आहे.त्यांच्याच नेतृृत्वात काॅग्रेसचे नेते या मतदारसंघात जिंकून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here