Home आलापल्ली काँग्रेसनेते कंकडालवार यांनी दिली अहेरी व आल्लापल्ली येथील विविध शारदा व दुर्गादेवी...

काँग्रेसनेते कंकडालवार यांनी दिली अहेरी व आल्लापल्ली येथील विविध शारदा व दुर्गादेवी मंडपांना भेट…शारदा व दुर्गा मातेची आशीर्वाद घेत मंडळाना दिली वर्गणी

17
0

अहेरी : आल्लापल्लीसह परिसरातील गावांमध्ये मांडण्यात आलेल्या विविध शारदा व दुर्गादेवी मंडळाना काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या सौ.सोनाली कंकडालवार तसेच काँग्रेसनेते मा.श्री.हणमंतु मडावी यांनी भेटी देऊन शारदा व दुर्गा मातेची आशीर्वाद घेतले.

तसेच काँग्रेसनेते कंकडालवार यांनी विविध मंडळाना आपल्यापरीने वर्गणी सुद्धा दिली.काँग्रेस नेते कंकडालवार यांनी सार्वजनिक आरती शारदा व दुर्गा मंडळ गोंडमोहल्ला,सखी शारदा मंडळ आलापल्ली,जयसेवा शारदा मंडळ,समित्रा शारदा मंडळ आलापल्ली,युवा शारदा महिला मंडळ टेकडी कॉलनी,आदर्श दुर्गा उत्सव मंडळ अहेरी,सार्वजनिक शारदा मंडळ रामय्यापेठा,समता महिला मंडळ आलापल्ली सह आदि मंडळाना भेट दिली.

यावेळी त्यांचे सोबत स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच मंडळाचे पदाधिकारी व सदस्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here