सिरोंचा : तालुक्यातील 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंकीसा भागातील येणारी जंगल व्यापी दुर्गम भाग चिटूर गावातील विध्यार्थ्यांसोबत ( शरद पवार गटाचे ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता – सागर भाऊ मूलकला यांनी विध्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन सण उत्सवात साजरा केली आहे.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता – सागर मूलकला यांनी बोलत गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुका हा दुर्गम भाग म्हणून ओळखले जातो.अशा या सिरोंचा तालुका तेलंगणा राज्याला जोडलेली असून तेलुगू भावनेतून पारंपरिक पद्धतीने दार वर्षी तालुक्यात मोठ्या उत्साहात हा रक्षाबंधन सण साजरा केला जातो.तालुक्यातील दुर्गम भागातही रक्षाबंधन सण साजरा करावा हा उद्देशाने जंगल व्यापी असलेल्या चिटूर गावात येऊन येथील विध्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा करणे अतिशय आनंद वाटत असल्याचे सांगितले आहे.त्यानंतर सागर भाऊ यांच्या हस्ते विध्यार्थ्यांना नोटबुक आणि पेनची वाटत करण्यात आले आहे.त्यावेळी राजू मूलकला,राजम मूलकला, अनिल दुर्गम,नवीन अकुदारी,कल्याण मूलकला यांच्या गावातील विध्यार्थी व मुख्याध्यापक – करपते सर यांची उपस्थिती होते.
Home सिरोंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सागर मूलकला यांनी केली विध्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरा