अहेरी : तालुक्यातील नागेपल्ली येथील सिनबिना जेमणिक लाकडा यांची कॅन्सरग्रस्त रुग्णांला हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्यासाठी पैशाची अडचण होती त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण होत होती.सिनबिना जेमणिक लाकडा यांच्या प्रकृतीची माहिती नागेपल्ली येथील आविसं अजयभाऊ मित्रा परिवार कार्यकर्तेकडून आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती दिली.माहिती होताच कॅन्सरग्रस्त महिलेला अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात आल्यावर रुग्णालयाच्या उपचारा करिता अजयभाऊ कंकडालवार यांनी आर्थिक मदत केले.
यावेळी उपस्थित नागेपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,किशोर दुर्गे,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, विनोद रामटेके, रवी भोयर,नरेश गर्गम,राकेश सडमेक प्रकाश दुर्गे लक्ष्मण आत्राम प्रमोद गोडसेलवारसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.