Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पंख तुटलेले पाखरू कार्यक्रमाचे उदघाटन

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पंख तुटलेले पाखरू कार्यक्रमाचे उदघाटन

74
0

एटापल्ली : दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी गेदा तालुका एटटापली येथील जय बजरंग नाट्य कला मंडळ गेदा यांच्या वतीने आयोजित केलेल्या पंख तुटलेले पाखरू”या”नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अधक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ ककंडालवार यांनी आपल्या उद्घाटकिय भाषणात जनतेला लोकप्रतिनिधींचे महत्त्व पटवून देतांना सांगितले.

“की”जन प्रतिनिधींनी गावातील समस्या व गावकऱ्यांची गरज लक्षात घेता गावाच्या विकासाची कामं करणे गरजेचे आहे.आज या भागातील जन प्रतिनिधी जसे आमदार – खासदार सारख्या जनप्रतिनिधींनी लोकांच्या समस्यां वाढती बेरोजगारी व महागाई,शेतकऱ्यांच्या न वाढणाऱ्या उत्पन्ना बाबत लोकसभेत व विधानसभेत प्रश्न उपस्थित करायला पाहिजे.जर ते समस्या सोडविण्यास व प्रश्न उपस्थित करण्यास सक्षम नसतील तर अश्या जनप्रतिनिधिंना मतं मागायला येथील तेव्हा विचारणा करा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदूभाऊ मटामी,सचिव प्रज्वल नागूलवार,रमेश वैरागडे सदस्य ग्रा.प.गेदा,कैलास उसेंडी ग्रा.प.सरपंच गुरुपल्ली,वंदूताई मटामी ग्रा.स.सदस्य गेदा,विनोबा आश्रम शाळा मुख्याध्यापक ताजनेसर,ग्रा.प.सदस्य शांताबाई भांडेकर,वेनारा इलका ग्रामसभा तालुका अध्यक्ष सुधाकर गोटा,अनिल करमरकर बाजार समिती संचालक अहेरी,आलापल्लीचे प्रतिष्ठित नागरिक स्वप्नील मडावी,गीताताई मट्टामी,वंदू यावजी,भगवंतराव छापले,दीपक भांडेकर,प्रदीप लटारे,वनपाल नागोसे सर,रोहित मिज,नरेश गावडे,सरपंच चोकेवाडा लालसु नरोटे,हालेवारा सुरेश मटामी,सुनील मडावी,नरानुरचे सोमजी वड्डे,शाउजी मान्यवर मंडळी व मोठया संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here